Monday, June 15, 2015

पाऊस...

पाऊस...
मला न समजलेला
आणि तरीही...
खोल कुठेतरी उमजलेला...
पाऊस...
कधी संतापाने बेभानलेला
कधी त्वेषाने घोंगावलेला...
कधी प्रेमाने स्पर्शाळलेला
कधी मायेने ओलावलेला...
कधी येण्याआधी संपलेला
कधी जाण्याआधी संपवलेला...
कधी आसमंतात उरलेला
कधी खोल जमिनीत मुरलेला...
कधी हर्षाळलेला
कधी ओशाळलेला
कधी घायाळलेला
कधी मायाळलेला
पाऊस...
मला न समजलेला
आणि तरीही..
खोल कुठेतरी उमजलेला...

No comments:

Post a Comment