Friday, January 13, 2017

रास्ता बोला....

न सोचा, न समझा
न जाना के कितनी 
मुश्किलें आयेंगी
मगर जैसे ही कदम बढाया
रास्ते ने पहल की
भई जा तो हम भी उसी ओर रहें है
क्यों ना साथ में ही चल दें
मंज़िल का तो पता नहीं
कम से कम सफ़र तो अच्छा कटे...

थँक्यू...!!!

"थँक्यू मित्रा"...माझ्या थँक्यूमुळे त्याची प्रचंड चलबिचल झाली होती...शेअर टॅक्सीच्या रांगेत तो माझ्या अगदी पुढेच उभा होता...आणि त्याच्याही पुढे किमान आठ ते दहा जण/जणी उभ्या होत्या...त्यामुळे त्या परिस्थितीतून पळ काढणं त्याच्यासाठी अशक्य होऊन बसलं होतं...गुटखा खाऊन त्यानं टाकलेली रिकामी पुडी अजूनही त्याच्या पायाशी रेंगाळत होती...आणि माझं थँक्यू त्याच्या कपाळावर जाऊन चिकटलं होतं...गोची तर झाली होती..."अब क्या करें...कहीं फेंकने के लिए जगह भी तो नहीं छोडी?"...त्याचा खच्ची झालेला पराभूत प्रश्न..."फिर जेब में डाल लो और घर जा के डस्बिन में फेंको"...माझं सहज उत्तर...काही क्षण तो विचारात पडला..आणि मग अचानक त्यानं फेकलेली पुडी उचलून खिशात टाकली..."आप सही केहेते हो"...या वेळी मात्र त्याची प्रामाणिक प्रतिक्रिया आली...मीही मग "अब सही में थँक्यू" म्हणत त्याच्या पाठीवर हात ठेवला..बदल शक्य आहे याची खात्री पटली...

(वि.सू.- इतकी वर्ष मुंबईत राहूनही पुणेरी खोचकपणा जिवंत असल्याचं आणि तो असाही कामी आल्याचं नंतर माझं मलाच समाधान मिळालं ;) )

पत्थर

कभी तो पत्थरों में जान आएगी
इस आस में बैठा वो पत्थर
इक दिन समा गया जमीन में
कुछ सौ साल बाद
ढुंढकर इतिहास बनने
गलती तो उसी की थी
भला पत्थरों में भी कभी जान आती है?