Wednesday, March 7, 2018

पुतळेबाजी



चला...
आता पुतळ्यांचं राजकारण करूया...
सर्व गरीबांची पोटं भरलीयेत...
सर्व बेरोजगारांना नोकरी मिळालीये...
सर्व शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाय...
सर्व मुलांना शिक्षण मिळालंय...
आपले प्रश्न तर सगळेच सुटलेत..मग काय?
चला...आता पुतळ्यांचं राजकारण करूया..

आया-बहिणींना बाहेर पडताना भीती वाटत नाही..
सरकारी बाबू फायलीसाठी पैसा लाटत नाही...
प्रमोशनसाठी कुणी कुणाचे तळवे चाटत नाही...
निवडणुकांसाठी कुणी कुणाला नोटा वाटत नाही...
समाधानानं डोळे तर सगळेच मिटलेत..मग काय?
चला...आता पुतळ्यांचं राजकारण करूया..

चोऱ्या-माऱ्या पाहून थकलेत सारे...
हक्कासाठी भांडून वाकलेत सारे...
स्वत:च्याच स्वार्थात माखलेत सारे...
पैशानं कणे मोडून टाकलेत सारे...
तेच तेच चघळून तर सगळेच विटलेत...मग काय?
चला...आता पुतळ्यांचं राजकारण करूया..

प्रविण वडनेरे